बचतगट ही महिला सक्षमीकरणाची चळवळ -स्मिता बरुहा
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्मिता बरुहा यांनी बचत गटातील महिलांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी चालविल्या जाणाऱ्या बचत गट चळवळीने बरुहा भारावल्या. तर बचत गटातील महिलांनी बनवलेल्या अस्सल महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घेतला.

निर्मल नगर येथील गायत्री महिला बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या विविध घरगुती उत्पादनांची बरुहा यांनी माहिती घेतली. भाजपच्या प्रवास यात्रा बचत गट संवाद कार्यक्रमनिमित्त त्या शहरात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन भाजपच्या शहर जिल्हा चिटणीस राखी आहेर यांनी केले होते. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांची उपस्थिती महिलांचा सन्मान केला.

याप्रसंगी प्रदेश सचिव गीता गिल्डा, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, सविता कोटा, महिला अध्यक्षा प्रिया जानवे, उपाध्यक्षा निता फाटक, गायत्री महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता शिवाजी पालवे, सचिव जाधोर, शारदा खामकर, रोहिणी कदम, सुकन्या हुशारे, दुर्गा संत, रंजना कदम आदींसह महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्मिता बरुहा यांनी महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास साधला जाणार आहे. बचतगट ही महिला सक्षमीकरणाची चळवळ म्हणून पुढी आली आहे. अनेक महिलांनी या चळवळीतून साधलेला विकास प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित महिलांनी शासनाच्या विविध योजना, भांडवल, मार्केटिंग, विविध उत्पादने व बाजारपेठ याविषयावर त्यांच्याशी संवाद साधला.