• Thu. Oct 16th, 2025

खोट्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सिस पे फिनोवेल्थ कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार

ByMirror

Feb 18, 2025

सभासदांसाठी सोसायटीचा जाहीर खुलासा

नगर (प्रतिनिधी)- सुपा (ता. पारनेर) आणि शिरुर (जि. पुणे) येथील सर्व सभासदांसाठी सिस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) आणि इन्फिनिटी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीने जाहीर खुलासा केला आहे.
सिस पे फिनोवेल्थ इंडिया (एलएलपी) ही केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स एलएलपी ॲक्ट 2008 अन्वये नोंदणीकृत आहे आणि तिचा नोंदणी क्रमांक 5047 आहे. तसेच, इन्फिनिटी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही संस्था मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2003 अंतर्गत केंद्र शासनाच्या अखातरित्यात नोंदणीकृत आहे, ज्याचा नोंदणी क्रमांक एमएस/सीआर/759/2013 आहे.


दोन्ही संस्थांनी सभासद, गुंतवणूकदार आणि भागधारकांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करत आहेत. संस्थांनी आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला लेखी फिक्स परताव्याची हमी दिली नाही. तसेच कोणतेही अमिष दाखवलेले नाही. संस्थेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत कोणत्याही सभासदाची फसवणूक झालेली नाही, आणि भविष्यात देखील फसवणूक होणार नाही याची संस्था हमी देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


तथापि, मागील काही दिवसांपासून काही तोतया आणि बनावट समाजातील काही विघ्नसंतुष्टी अपप्रवृत्ती चे व्यक्ती खोटी अफवा पसरवण्यात येत आहेत. या व्यक्तींनी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचवण्याचा, संस्थेला बदनाम करण्याचा आणि सभासद, गुंतवणूकदार तसेच भागधारकांच्या आर्थिक नुकसान होण्याचा उद्देश ठेवलेला आहे. त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांना खोटी आणि तथ्यहीन माहिती दिली असून, सोशल मिडियावर खोट्या बातम्या, आक्षेपार्ह संदेश, छायाचित्रण, बदनामीकारक मजकूर आणि अफवा पसरवली असल्याचा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.


संस्था संचालक मंडळाने यावर जाहीर खुलासा केला आहे की, जो कोणी ठोस पुरावा नसताना खोट्या बातम्या पसरवेल, त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच, संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयात पुराव्याद्वारे कारवाई केली जाईल. यासाठी ॲड. ज्ञानेश्‍वर सिताराम कराळे आणि ॲड. विदयालता अशोक कमलेकर (कायदेविषयक सल्लागार) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात भूमिका स्पष्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *