मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व धर्मिय युवकांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा येथील संजय नगर मित्र मंडळाच्या वतीने सर्व धर्मिय युवकांनी एकत्र येवून श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेशाच्या आगमनासाठी निघालेल्या मंडळाच्या मिरवणुकीत सर्व धर्मिय युवकांनी लक्ष वेधले. शहरात जातीय तणावाच्या घटना समोर येत असताना, या भागातील युवकांनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.
लोकमान्य टिळकांचा वारसा जपणारे संजय नगर मित्र मंडळ मागील 42 वर्षापासून सर्व समाजाला बरोबर घेवून गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी देखील गणेशोत्सवनिमित्त विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुला मुलींसाठी विविध पारंपारिक खेळ, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, महिलांसाठी देखील विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळाचे शंकर पंडीत, अविनाश गायकवाड, महेश सुर्यवंशी, संदीप सुर्यवंशी, मुकुंद सोनावणे, सागर घोगरे, राहुल देवगण, अम्मु शेख, सुनिल पंडीत, विकास गवळी, सुरज गवळी, रोहित भंडारी, अजय अटक, आरिफ पठाण, जावेद पठाण, निसार शेख, सनी उल्हारे, आझाद शिंदे, रोहित जावळे आदींसह सर्व संजय नगर परीवार प्रयत्नशील आहे.
