दंत विकारावर मिळणार सर्व प्रकारच्या अद्यावत उपचार सुविधा
अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या शहरातील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सा विभाग कार्यान्वीत करण्यात आले. या विभागाच्या माध्यमातून दंत विकारावर सर्व प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

श्रीदीप हॉस्पिटलच्या दंत रोग विभागाचा शुभारंभ दंतरोग तज्ञ डॉ. हर्षा गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीदिप हॉस्पिटलचे डॉ. सतीश सुपेकर, डॉ. अमित बडवे, डॉ. सचिन घुले, डॉ. निरज गांधी, डॉ. गणेश झरेकर, डॉ. मिरा बडवे, डॉ. अंजू घुले, डॉ. निशिकांत बनकर, डॉ. गौरी बनकर , डॉ. रेश्मा चेडे आदींसह श्रीदीप हॉस्पिटचे सर्व डॉक्टर्स व आरोग्यकर्मचारी उपस्थित होते.

डॉ. हर्षा गांधी म्हणाल्या की, नागरिकांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य कायम टिकवण्यासाठी त्यांच्या दंत विकारावर अद्यावत उपचार केले जाणार आहे. दंत रोगाच्या उपचारासह विविध शस्त्रक्रिया आणि अद्यावत उपचार पध्दतीचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. नागरिकांना अद्यावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या श्रीदीप हॉस्पिटलच्या एका छताखाली आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सचिन घुले व डॉ. अमित बडवे यांनी डॉ. गांधी यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छ दिल्या.