शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे; पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद
राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिवकालीन वेशभूषा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाळगोपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, नेताजी पालकर, बाजी प्रभू आदी विविध व्यक्तींच्या वेशभूषा परिधान केल्याने अक्षरश: शिवशाही अवतरली होती. शिवाजी महाराजांचे पराक्रम व शौर्य दर्शविणारे चित्र विद्यार्थ्यांनी यावेळी रेखाटले. तर वाचन संस्कृती वाढविण्याच्या उद्देशाने अल्पदरात मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला. गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालया समोर हा सोहळा रंगला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, उद्योजक अमोल गाडे, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला शहराध्यक्षा रेश्मा आठरे, युवती सेलचे अंजली आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, भाऊसाहेब नेमाने, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, दिपाली आढाव, किरण घुले, ऋषीकेश जगताप, दीपक वाघ, शिवम कराळे, गौरव हरबा, केतन ढवण, पंकज शेंडगे, आशुतोष पानमळकर, मयूर रोहोकले, कृष्णा शेळके, दीपक गोरे, ओंकार मिसाळ, शुभम चितळकर, ओंकार म्हसे, रोहित सरना, यशवंत तोडमल आदींसह युवा कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, घराघरात शिवाजी महाराजांचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराजांचे विचार मुलांमध्ये रुजल्यास खऱ्या अर्थाने देश महासत्ता होणार आहे. इतिहास माहीत झाल्याशिवाय भविष्य घडविता येत नाही, त्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
संपत बारस्कर म्हणाले की, प्रत्येक महिलांनी स्वतः जिजामाता होऊन आपल्या घरात शिवाजी महाराजांच्या विचाराने मुलगा घडवावा. घराघरात शिवाजी महाराज तयार झाल्यास समाजाचा सर्वांगीन विकास साधला जाणार आहे. या स्पर्धेमुळे घराघरात शिवाजी महाराजांच्या विचारांचा करण्यात आलेला जागर प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश बनसोडे यांनी मुलांच्या कलागुणांना वाव निर्माण करून देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून कलागुणांना चालना मिळाली असल्याचे स्पष्ट केले. अमोल गाडे यांनी हाती मोबाईल आलेल्या मुलांच्या हातात पुस्तके देण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन दिशादर्शक असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत शिवकालीन वेशभूषा परिधान करुन विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. शिवाजी महाराजांचा इतिहास रंगमंचावर जीवंत करण्याचे काम बाळगोपालांनी केले. तर शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील प्रसंग आपल्या चित्रातून विद्यार्थ्यांनी रेखाटले होते. यामधील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश जोशी, कुणाल ससाणे, मंगेश शिंदे, ओंकार साळवे, अभिजीत साठे, अरबाज शेख, तन्वीर मणियार, रवींद्र राऊत, तेजस अतीतकर, प्रशांत पालवे, साहिल पवार, समृद्ध दळवी, वैभव ससे, संदीप गवळी, स्वप्नील कांबळे, निलेश ढवण, झगडे, कुऱ्हाडे, पाटील, धस, कुटे, लांडगे आदींनी परिश्रम घेतले.