अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संघाची सभा पार पडली. यामध्ये शहर मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी रामराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव घाडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मिथुन डोंगरे, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, महानगरचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, राज्य प्रतिनिधी शितल बांगर, प्राचार्य उल्हास दुगड, अजय बारगळ, प्राचार्य संभाजी पवार, दशरथ कोपनर, प्रभाकर भाबड, शरद दळवी, संतोष उरमुडे, बांगर सर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी घाडगे सर यांचे निवडीबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.