तर चौथ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व शौर्याची गाथा सांगणारा शाहिरी जलसा रंगणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी दिली.
काव्य संमेलनात ज्येष्ठ व नवोदित कवी सामाजिक प्रश्नांवर कविता सादर करणार आहे. काव्य संमेलनमध्ये राज्यासह जिल्ह्यातील नामवंत कवी व नवोदित कवी सहभागी होणार आहेत. तर शाहिरी जलसा कार्यक्रमात शाहीर पोवाडे सादर करुन शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणार आहे.
या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, ग्रामविकास व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ योगदान देऊन उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण व शिवराय भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन डोंगरे संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. पै. नाना डोंगरे, अध्यक्ष (संस्थेचे कार्यालय) स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.