शेकडो वर्षे गुलामीत जगणाऱ्यांसाठी शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या मातीत घडलेला भोसले कुटुंबातील पूर्वजांचा पराक्रम व स्वराज्य निर्मितीच्या इतिहास उलगडण्यात आला.
प्रारंभी शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाले की, शेकडो वर्षे गुलामीत जगणाऱ्यांसाठी शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटविले आणि ते अथक परिश्रमाने पुर्णत्वास आणले. जगातील सर्वश्रेष्ठ पिता म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असे पराक्रमी पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेले महापुरुष म्हणजे शहाजीराजे.
स्वराज्यासाठी पिता म्हणून ते शिवरायांच्या मागे उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इतिहासात देशभर व राज्यभरात पसरलेले भोसले घराण्याच्या पराक्रमाची माहिती व पूर्वजांचा इतिहास उलगडून सांगण्यात आला.