तोफखाना पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता रोड, नंदनवन नगर येथील शब्बीर कादर सय्यद (वय 45 वर्षे) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सततच्या शोधानंतरही ते अद्याप सापडलेले नाहीत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी शबाना शब्बीर सय्यद (वय 36 वर्षे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास शब्बीर सय्यद यांनी पत्नीला कामाला जात आहे, असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते परत आलेले नाहीत. प्रारंभी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले असतील, असा कुटुंबीयांचा समज होता. मात्र दीर्घकाळ संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला आणि अखेर त्यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शब्बीर सय्यद यांचे वय 45 वर्षे, उंची अंदाजे 5 फूट 5 इंच, रंग गोरा, चेहरा गोलाकार, नाक सरळ, केस काळे असून त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर इंग्रजीत नाव गोंदलेले आहे. त्यांच्या या ओळखीवरून नागरिकांना शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहरातील विविध भागात तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर राजेय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोणालाही शब्बीर सय्यद दिसल्यास अथवा त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास, त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा कुटुंबीयांच्या 9405491588 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
