शरीफजी राजे भोसले यांच्या समाधीचे घेतले दर्शन; ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची लढाई ठरलेली व मराठ्यांच्या शौर्याची प्रचेती देणाऱ्या भातोडीच्या (ता. नगर) युध्दभूमीला ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी भेट दिली. तर शरीफजी राजे भोसले यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भातोडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, पत्रकार आदिनाथ शिंदे, सरपंच विक्रम गायकवाड, सुभाष कचरे, जालिंदर लबडे, बाबासाहेब काळे, दिनेश आवटी आदी उपस्थित होते.
साहित्यिक विश्वास पाटील यांनी भातोडी येथील तलावाची पहाणी करुन येथील शहाजीराजे व शरीफजी राजे भोसले यांच्या इतिहासाची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थांची संवाद साधताना ऐतिहासिक गौरवशाली लढाई बद्दल सांगताना पाटील म्हणाले की, हिंदुस्तानच्या इतिहासात प्रथमच औरंगजेब सेनेचा पराभव शहाजी आणि शरीफजी या बंधूंनी केला.
औरंगजेबच्या बलाढ्य सेनेला पराभूत करताना कमी सैन्य दलाने गनिमी काव्याने युक्तीचा वापर करून युद्धात धूळ चारली. पण या युद्धात शरीफजी राजे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या समाधी स्थळाची अवस्था पाहून खंत व्यक्त केली. तर ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण यामध्ये घडवून सरकारी दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.