महिलांना सहभागी होण्याचे आवाहन; तीन विजेत्यांना पैठणी बक्षीस
अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी विधी कक्षाच्या प्रदेश प्रमुख अंजली आव्हाड यांनी केले आहे.
महिलांच्या कला-गुणांना वाव देवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक पैठणी साडी बक्षीस देण्यात येणार आहे. महिलांना सजवलेल्या गौरी-गणपती बरोबर आपला काढलेला फोटो 7028828803 या क्रमांकावर 24 सप्टेंबर पूर्वी पाठवायचा आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी निशुल्क आहे.
