• Wed. Mar 12th, 2025

आजपासून सावेडीत सावित्री ज्योती महोत्सवाला प्रारंभ

ByMirror

Jan 9, 2025

चार दिवस रंगणार सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांच्या स्टॉलसह खाद्य पदार्थांची मेजवानी

नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवाचे आजपासून प्रारंभ होत असून, भरगच्च कार्यक्रमाची जत्रा भरणार आहे. तर राज्यातील महिलांच्या विविध उत्पादनांचे विविध स्टॉल थाटण्यात आले आहेत. 9 ते 12 जानेवारी दरम्यान जय युवा अकॅडमी, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर महानगरपालिका, रयत प्रतिष्ठान, उडान फाउंडेशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा रुग्णालय, शहर बार असोसिएशन, असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य आदींच्या सहयोगाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नगरकरांना या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या महोत्सवामध्ये अकोले राजूरचा हातसाडीचा तांदूळ, इंद्रायणी काळभात, कर्जतची शिपी आमटी, परदेशात गाजलेले माठातील लोणचे, सोलरची उत्पादने, उकडीचे मोदक, सांबर वड्या, आवळ्याचे विविध प्रकार, मसाले, गावरान तुप, साई दरबाराची स्पेशल पाव भाजी, रांगोळी स्टिकर्स, उन्हाळी वाळवणे, पापड, मातीचे भांडे, लाकडी पोळपाट, रोस्टेड गहू, राजुरचे पेढे, हरबल चाय, विविध प्रकारचे कपडे, महिलांचे सौंदर्यप्रसाधने, हस्तकलेचे साहित्य, हरबल प्रॉडक्टसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.


याशिवाय देश सेवेत कार्य करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान देखील या कार्यक्रमात केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी भव्य महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आहे. आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांचा ब्युटी क्षेत्रातील सेमिनार असून, ब्युटी टॅलेंट शो घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय युवा सप्ताहनिमित्त युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार वितरण समारंभ असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष किशोर डागवाले व स्वागताध्यक्ष ॲड. धनंजय जाधव यांनी दिली.


महोत्सवास आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त यशवंत डांगे, ॲड. बाबुराव अनारसे, वाल्मिक निकाळजे, महेंद्र गंधे, ॲड. अभय आगरकर, ॲड. सुरेश लगड, राजेंद्र उदागे, सुहासराव सोनवणे, डॉ. दिलीप जोंधळे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त व्हि.डी. शेंडे, आमसिद्ध सोलनकर, संकल्प शुक्ला, डॉ. अनिल बोरगे, भगवान फुलसौंदर, मंगल भुजबळ, ॲड. भूषण बऱ्हाटे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, शरदराव झोडगे, अनिल बोरुडे, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. राजेश कातोरे, ॲड. लक्ष्मण कचरे, न्यायाधीश भाग्यश्री पाटील, खासदार निलेश लंके, पद्मश्री पोपट पवार, डॉ. सुरेश पठारे, ॲड. प्रशांत साळुंके, सुनील त्रिपाठी, संजय गारुडकर आदी मान्यवर चार दिवसाच्या विविध उपक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे यांनी दिली.


महोत्सवासाठी दिनेश शिंदे, प्रा. सुनील मतकर, जयश्री शिंदे, भीमराव उल्हारे, बाळासाहेब पाटोळे, गणेश बनकर, रावसाहेब मगर, आरती शिंदे, विद्या शिंदे, प्रा. हर्षल आगळे, पोपट बनकर, मीना म्हसे, रजनी ताठे, रावसाहेब काळे, विनोद साळवे, अनिल साळवे, डॉ. अमोल बागुल, अनंत द्रविड, राजकुमार चिंतामणी, कावेरी कैदके, अश्‍विनी वाघ, विद्या सोनवणे आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *