• Sun. Nov 2nd, 2025

सारसनगरच्या विधाते विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

ByMirror

Jun 16, 2024

शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तकांचे वाटप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिम व माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला. गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवारात रांगोळी काढून, फुग्यांची सजावट करण्यात आली होती.


संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सुसे, शिक्षकवर्ग सविता सोनवणे, लता म्हस्के, राधाकिसन क्षीरसागर, दरवडे योगेश, भाऊसाहेब पुंड, जावळे निता, अमोल मेहेत्रे, सारिका गायकवाड, सचिन बर्डे आदी उपस्थित होते.


प्रा. शिवाजीराव विधाते यांनी शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होऊन त्याची प्रगती होते. परिस्थिती बदलण्याची शक्ती शिक्षणात असून, श्रमिक कष्टकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षाणे आपला उत्कर्ष साधण्याचे त्यांनी आवाहन केले. मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *