नगर (प्रतिनिधी)- शहरात पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतल्याबद्दल संजय अलग यांचा भारत भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारत भारतीचे अध्यक्ष कमलेश भंडारी, वाल्मिक कुलकर्णी, राधाकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, कृष्णा वाखुरे, अशोक कोळे, चंद्रकांत पंडित, भारत भारतीच्या महिला अध्यक्षा विनया शेट्टी, विनिता छाब्रिया आदी उपस्थित होते.
संजय अलग भारत भारती श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष आहेत. ते माता की चौकीच्या माध्यमातून धर्म प्रसाराचे काम करीत असून, भाविक भक्तांना आपल्या कार्यक्रमातून मंत्रमुग्ध करत आहे. त्यांचे महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरु असल्याचे कमलेश भंडारी यांनी सांगितले. भारत भारतीचा एक मोठा परिवार एकमेकांशी जोडला गेला असल्याची भावना संजय अलग यांनी व्यक्त केली.
भारत भारतीच्या वतीने संजय अलग यांचा सत्कार
