साहित्य व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
अंथुर्णे (ता. इंदापूर, जिल्हा- पुणे) येथे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन व कवी संमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कवी संमेलनाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवी रज्जाक शेख, कवी आनंदा साळवे, कवी रणशिवे, ज्येष्ठ साहित्यिक सिताराम नरके, कवियत्री जयश्री सोनवणे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी गावात धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालय सुरु करुन मुलांना वाचनाची आवड लावण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे. तर विविध साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना डोंगरे संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. पहिले काव्य संमेलन यशस्वी करुन नगर तालुक्यात दुसरे काव्य संमेलनाची तयारी सुरु असून, त्यांच्या साहित्य क्षेत्रातील या योगदानाबद्दल त्यांचा या साहित्य संमेलनात सन्मान करण्यात आला.