• Sun. Mar 1st, 2026

माजी मंत्री बबनराव घोलप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

ByMirror

Aug 12, 2025

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा रविवारी मेळावा

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात रविवारी (दि. 17 ऑगस्ट) राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नवीन टिळक रोडवरील हॉटेल पॅराडाईज येथे सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी मंत्री तसेच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे हे कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघात प्रवेश करणार आहेत.

याशिवाय मेळाव्यात चर्मकार समाजातील विविध प्रलंबित प्रश्‍न, विकासाच्या संधी आणि समाज एकतेबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, महिला जिल्हाध्यक्ष लताताई नेटके, संयोजक माणिकराव नवसुपे यांनी समाजबांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


या मेळाव्यासाठी मा. आमदार भाऊसाहेब कांबळे, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्याचे दुसरे अध्यक्ष शांताराम कारंडे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शोभाताई कानडे, युवक राज्य कार्यकारिणी सदस्य कैलासराव गांगर्डे, चंद्रकांत नेटके, दत्तात्रय गोतीसे, दिलीप कानडे, अनिल कानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *