• Fri. Sep 19th, 2025

जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव गायकवाड

ByMirror

Jun 10, 2025

व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन काझी यांची निवड

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव महादू गायकवाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन सिराजुद्दीन काझी यांची निवड करण्यात आली आहे.


अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली. या पार्श्‍वभूमीवर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया निवडणूक अधिकारी व्ही.के मुटकुळे व पालवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.9 जून) संस्थेच्या कार्यालयात झाली. यावेळी गायकवाड यांची अध्यक्षपदी तर व्हाईस चेअरमनपदी काझी यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा मुटकुळे व पालवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संचालक रवींद्र बोरावके यांची देशाच्या सर्व राज्यांना वीज पुरवठा नियंत्रण करणाऱ्या ग्रीड इंडिया डायरेक्टरपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी संचालक प्रशांत गायकवाड, प्रकाश सदाफुले, अर्चना म्हस्के, ज्योती गोलेकर, अशोक राशिनकर, विठ्ठल अभंग, रवींद्र बोरावके, शिवाजीराव कपाळे, नितीन चासकर, धनंजय गाडेकर, अशोक थोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *