• Thu. Oct 16th, 2025

रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ -राजेंद्र गवई

ByMirror

Aug 27, 2023

रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष गवई यांनी साधला शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ व काळाची गरज आहे. रिपाई शक्तीने पुन्हा चार खासदार निवडून आणता येतील. एकत्र येण्यासाठी चांगले वातावरण आहे. रिपब्लिकन ऐक्यानंतर नेतृत्व कोणीही करा, मात्र एकत्र या! दुसऱ्यांची गरज भासणार नसल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी केले. तर अमरावतीत रिपाई स्वतःच्या चिन्हावर जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीने जागा न दिल्यास स्वबळाचा नारा दिला जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.


रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी रविवारी (दि.27 ऑगस्ट) शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात बैठक घेवून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक आघाडीचे गुलाम शेख, सचिन शिंदे, नईम शेख, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, निजाम शेख, जमीर सय्यद, जमीर इनामदार, आवेज काझी, सुफियान काझी, रवी कानडे, अजीम खान, बंटी बागवान, जावेद सय्यद, प्रकाश भटेजा, आदिल शेख, सोहेल शेख, अरबाज शेख, हुसेन चौधरी, उमेश गायकवाड, ज्योती पवार, संपदा म्हस्के, पूजा साठे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे गवई म्हणाले की, अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसने जाहीर केली. ही जागा त्यांच्या कोट्यात येते का नाही? ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात निवडणुकीला व निवडून येण्यासाठी रिपाई लागते. मात्र त्यांना जागा दिली जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. रिपाईला अमरावतीमध्ये जागा न मिळाल्यास महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांनी महाविकास आघाडीला जागा दाखविण्याचे त्यांनी आवाहन केले.


काँग्रेस पक्ष रिपाईची शक्ती कमी करत असल्याचा आरोप करुन, मित्र पक्षाला कमकुवत केल्यामुळेच काँग्रेसची दशा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गवई यांनी शहर व जिल्ह्यातील राजकीय समीकरण, सध्याचे राजकारण व भविष्यातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शहर रिपाईच्या वतीने गवई यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.


सुशांत म्हस्के म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गवई यांच्या भूमिका व निर्णयाला सर्व भिमसैनिकांचा पाठिंबा राहणार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेवून कार्यकर्त्यांना आदेश द्यावे. जिल्ह्यात देखील रिपाईच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे कार्य उत्तमपणे सुरु असून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युवकांचे उत्तमप्रकारे संघटन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *