अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन यशवंत कांडेकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर व आदर्श शिक्षक भरत कांडेकर यांचे ते वडिल होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक असल्याने गावातील सर्वांशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.