• Sat. Nov 1st, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी व जनरल शस्त्रक्रिया शिबिराला प्रतिसाद

ByMirror

Sep 16, 2024

कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हॉस्पिटलचा पुढाकार

आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना नवजीवन देणारे आरोग्यमंदिर -पोपटलाल पितळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील चोवीस वर्षापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेत पितळे परिवाराला योगदान देण्याचे भाग्य मिळत आहे. सर्वसामान्य रुग्णांची काळजी घेऊन हॉस्पिटलने मोठा विश्‍वास संपादन केला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना आधार व नवजीवन देणारे आरोग्यमंदिर बनले असल्याची भावना पोपटलाल कुंदनमल पितळे यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पितळे परिवाराच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी व जनरल शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पोपटलाल पितळे बोलत होते. याप्रसंगी सौ. चंद्रकला पितळे, अमोल पटवा, मोहित पितळे, रोहित पितळे, डॉ. प्रकाश कांकरिया, निखिलेंद्र लोढा, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, डॉ. आशिष भंडारी, कॅन्सर सर्जन डॉ. अनिकेत शिंदे, जनरल सर्जन डॉ. आर.एन. पांडे, डॉ. भास्कर जाधव आदी उपस्थित होते.


प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते हॉस्पिटलमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रीची आरती करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, सर्व समाजाचा हातभार लागल्याने हे आरोग्य मंदिर उभे राहिले आहे. हॉस्पिटल रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. सर्वांच्या योगदानाने आरोग्याचे महायज्ञ सुरु असून, दिवसेंदिवस आरोग्यसेवेचे कार्य वाढत आहे. राज्यातून गरजू घटक उपचारासाठी येथे येत असून, हॉस्पिटलचे सर्व घटक सेवाभावाने योगदान देत आहे. समाजाला अद्यावत शिक्षणाची गरज ओळखून भगवान महावीर युनिव्हर्सिटी उभी राहत आहे. या प्रकल्पाला देखील पितळे परिवाराने मोठे योगदान दिले असून, सामाजिक कार्यात पितळे परिवाराचे सातत्याने सहकार्य लाभत आहे.


डॉ. अनिकेत शिंदे म्हणाले की, लाईफस्टाईलमुळे व प्रदूषित अन्नपदार्थ, हवा व पाणी शरीरात गेल्यास त्याचे दुष्परिणाम कॅन्सरच्या रूपाने दिसत आहे. कॅन्सर टाळण्यासाठी त्याची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृती अत्यंत गरजेची आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृतीचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. आर.एन. पांडे यांनी हॉस्पिटलमध्ये होत असलेली जनरल सर्जरी व लॅप्रोस्कोपी सर्जरीची अद्यावत सोयी सुविधांची माहिती दिली.
रोहित पितळे यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात हातभार लावण्याची संधी मिळाली हे भाग्य असून, पितळे परिवार सातत्याने या सेवाकार्यात योगदान देणार असल्याचे स्पष्ट केले. या शिबिरात कॅन्सर तपासणी शिबिरात 80 रुग्ण तर जनरल शस्त्रक्रिया शिबिरात 90 रुग्णांची तपासणी करुन शिबिरातील गरजूंवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *