पत्रकारितेतून सामाजिक कार्य अन जनजागृती उल्लेखनीय बाब -गडकरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निष्पक्ष पत्रकारिता आणि त्यामाध्यमातून होणारे समाजिक कार्य व जनजागृती उल्लेखनीय बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अहमदनगर येथील क्रांती या दीपावली विषेशांकांचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. तर बालविवाह रोखून अल्पवयीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रांती विशेषांकाच्या माध्यमातून करण्यात आलेली जागृती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षाप्रमाणे यंदाही सामाजिक प्रबोधनात्मक अंक समग्र दृष्टिकोनातून घडवूया क्रांती यां शीर्षकाखाली दीपावली विषेशांक काढण्यात आले आहे. नुकतेच नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सोलपूर मतदारसंघाचे आमदार तथा लोकमंगल समुहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख, संपादक इकबाल शेख, विभागीय प्रतिनिधी सचिन बिद्री, व्यवस्थापक रजत दायमा, धाराशिव प्रतिनिधी अय्युब शेख, भाजप माजी सैनिक आघाडी नागपूरचे उपाध्यक्ष राम कोरके, नागपूर प्रतिनिधी अनिल बालपांडे, सहदेव वैद्य आदी उपस्थित होते.
पत्रकारितेचा वारसा पाहिला तर फक्त बातम्या लावणे पुरेसे ठरत नाही. त्या बातमीच्या संदर्भातील सर्वंकष भूमिका मांडली जाणे महत्त्वाचे आहे. पत्रकारिता बंधनमुक्त असावी आणि निर्भीड असल्यास समाजाला योग्य दिशा देता येणार असल्याचे रजत दायमा यांनी सांगितले. तर अंकाच्या माध्यमातून सामाजिक व प्रबोधनात्मक कार्याचा मांडण्यात आलेला लेखाजोखा त्यांनी स्पष्ट केला.
