गावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले युवा वर्ग
गावाच्या विकासासाठी व आरोग्यासाठी ग्रामस्वच्छता राबविणे आवश्यक -आरती शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासासाठी व आरोग्यासाठी ग्रामस्वच्छता राबविणे आवश्यक आहे. गावातील रोगराई दूर करण्यासाठी तसेच शेतकरी, ग्रामस्थ, महिला, लहान मुले व पशुधन यांना रोगराईपासून वाचविण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. आज केलेली स्वच्छता उद्याचा भविष्य उज्वल करणारी असल्याचे प्रतिपादन उडान फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.
माय भारत उपक्रमातंर्गत नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व उडान फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रतडगाव (ता. नगर) येथे स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी दत्तू वाघुले, अनिल बनसोडे, सोपान जाधव, दत्तू बनसोडे, अशोक वाघुले, प्रशांत बनसोडे, अमोल निकम, रमेश बनसोडे, अक्षय मिसाळ, गोकुळ बनसोडे, अक्षय वाघुले, तनिष बनसोडे आदींसह ग्रामस्थ व युवक वर्ग मोहिमेत सहभागी झाले होते.
गावातील ओढे, सार्वजनिक रस्ते, घरापुढील अंगण, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, शाळा व धार्मिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती करण्यात येणार असल्याची माहिती आरती शिंदे यांनी दिली.
या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, सुहासराव सोनवणे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
