तर सेक्रेटरीपदी प्रमोद कदम यांची नियुक्ती
कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधत लढा उभारणार -रामेश्वर ढाकणे
नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन ग्रुप सी व पोस्टमन एमटीएस युनियनचे संयुक्त द्वैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अहिल्यानगर विभागाच्या ग्रुप सी च्या अध्यक्षपदी रामेश्वर ढाकणे, सेक्रेटरीपदी प्रमोद कदम यांची तर पोस्टमन एमटीएसच्या अध्यक्षपदी सलीम शेख व सेक्रेटरीपदी गणेश केसकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन महाराष्ट्र सर्कल ग्रुप सी चे सेक्रेटरी सुरेंद्र पालव, पोस्टमन एमटीएस युनियनचे जनरल सेक्रेटरी राजेश सांरग, मुंबई पोस्टल सोसायटीचे मानद सचिव महेश सावंत, गुरुदत्त आळवे, चंद्रशेखर शिंदे, बाळकृष्ण चाळके, सदानंद राणे, राजू तुपे, संजय हिंदुराव, शंकर म्हस्के, रघुनाथ ससाणे, दत्तात्रय जासूद यांच्यासह अहिल्यानगर डिव्हीजन विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सुरेंद्र पालव म्हणाले की, महिला कर्मचारी यांच्या सुरेक्षेसाठी मुलभुत सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी नियुक्ती मिळावी, संगणक व मोबाईलवर काम करताना होणाऱ्या डोळ्यांच्या विकारासाठी विशेष भत्ता देण्यात यावा, आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळावा यासाठी सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे.
ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना रामेश्वर ढाकणे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्षाची वेळ येणार नाही, अशा पध्दतीने काम करण्याचे धोरण आखले जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधत लढा उभारणार आहे. यावेळी ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन महिला कमिटीच्या चेअरमनपदी रुपाली निसळ, ज्योती कांबळे, एसएटीओबीसी कमिटीच्या चेअरमनपदी विजय चाबुकस्वार, विजय जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्लकुमार काळे यांनी केले. आभार अमीत कोरडे यांनी मानले. यावेळी अहिल्यानगर विभागातील कर्मचारी सुनील कुलकर्णी, निसार शेख, महेश तामटे, किशोर नेमाने, सलीम शेख, शिवाजी कांबळे, स्वप्ना चिलवर, अर्चना दहिंडे, बळी जायभाय, सुनील भागवत, सतीश येवले, दिपक जसवाणी, अंबादास सुद्रीक, रुषिकेश कार्ले, प्रदीप बनकर, शरद नवसुपे, अरविंद वालझाडे, विजय चाबुकस्वार, संदीप मिसाळ, सुखदेव पालवे, जय मडावी, कविश्वेर ताकपेरे, अविनाश आढाव, सुनील जाधव, देवेंद्र शिंदे, आनंद भोंडवे, कैलास भुजबळ, पदमराज पडलवार, शंकर कडभणे, दिलीप खरात, भिवसेन खरात, अमोल बोरुडे, गणेश कोल्हे, अशोक घुले, बलराम दाते, विनायक सोनावळे, सुभाष चव्हाण, अश्विनी फुलकर, शुभांगी मांडगे, सविता आवारे, शुभांगी सस्कर, अक्षरा दरवडे, रोहिणी राऊत, अर्चना रणखाम आदी कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.