तर पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्तपदी भीमराज कोडम यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्याना यांची गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रसेवा दलाचे भीमराज कोडम यांची पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली.
संस्थेच्या कार्यकारणी सभेत म्याना यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. तर संस्थेच्या रिक्त विश्वस्तपदी नूतन विश्वस्त म्हणून कोडम यांची एकमाताने नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, प्रा. बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने म्याना व कोडम यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.