डोंगरे व सोनवणे यांनी पोलीस दलात प्रामाणिक कार्याचा ठसा उमटविला -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथील राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांची सहाय्यक फौजदार पदावर बढती मिळाल्याबद्दल त्यांचा नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे तर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पुष्पा सोनवणे यांना नुकतीच सहाय्यक फौजदार पदावर बढती मिळाली आहे. याबद्दल डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी राजेंद्र डोंगरे आणि सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ज्येष्ठ शिक्षक नीलकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, अमोल वाबळे, तेजस केदारी, सुवर्णा जाधव, भाऊसाहेब फलके, बाळू ठुबे, विलास वैराळ, मयूर काळे, राम जाधव उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून पोलीस दलात कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांची झालेली बढती ही गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. साहेबराव बोडखे यांच्यासह उपस्थितांनी डोंगरे व सोनवणे यांना पोलीस दलात मिळालेल्या बढतीबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निळकंठ वाघमारे यांनी बढती मिळालेले दोन्ही पोलीस नवनाथ विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा सर्वांना अभिमान असल्याचे स्पष्ट केले.