विद्यार्थ्यांच्या प्रभावी भाषणांनी जिंकली उपस्थितांची मने
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री शाहू विद्या मंदिर, खडांबे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी अशोकराव उंडे साहेब (उंडे नर्सरी संचालक), कृषिभूषण सुरसिंगराव पवार, बाळासाहेब लटक े(माजी उपसभापती पंचायत समिती), यशवंत ताकटे (माजी सरपंच), श्यामराव खेसम्हाळसकर (माजी सरपंच), इंजि. मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब जठार, अनशाबापू आवारे (ग्रामपंचायत सदस्य), भाऊसाहेब खळेकर (माजी मुख्याध्यापक), अर्जुनराव खळेकर (माजी उपसरपंच), केरू कल्हापुरे, गुलाबराव पवार, बाळासाहेब कल्हापुरे, भानुदास कल्हापुरे, दादा पाटील काचोळे, उपसरपंच अमोल हरिश्चंद्रे तसेच अनिल कल्हापुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्य, सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक क्रांतीवर आधारित भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

