कामगारांच्या न्याय, हक्क व कल्याणासाठी भाजपा कामगार मोर्चा कटिबध्द -प्रतापसिंह शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय असलेले रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे पाटील यांच्या हस्ते आंबेडकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंह शिंदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शामजी पिंपळे, प्रतिष टकले, मोहनराव गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिर्डी येथे भाजपा कामगार मोर्चाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यामध्ये आंबेडकर यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी राज्याच्या विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतापसिंह शिंदे म्हणाले की, कामगारांच्या न्याय, हक्क व कल्याणासाठी भाजपा कामगार मोर्चा कटिबध्द आहे. श्रमजिवी कामगारांचे जीवन जगून त्यांच्या प्रश्नांवर आंबेडकर यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या व्यथा व प्रश्न त्यांना माहित असल्याने त्यांच्या माध्यमातून श्रमजिवी कामगारांना न्याय मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, जिल्ह्यातील नगर, सुपा, भाळवणी येथील एम.आय.डी.सी. मध्ये श्रमजिवी कामगारांचे शोषण सुरु आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. पक्षाच्या माध्यमातून कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. राजकीय दलाल आणि ठेकेदार यांनी औद्योगिक क्षेत्रात हैदोस घातला असून, शेतकरी कुटुंबातील बेरोजगार युवकांसाठी भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रघुनाथ आंबेडकर भाळवणी (ता. पारनेर) येथील असून, मागील 37 वर्षापासून कामगार व सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी पारनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्य कमिटीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रा. भानुदास बेरड, अभय आगरकर, राहुल पाटील शिंदे, सुवेंद्रभैय्या गांधी, अश्विनी थोरात, दादासाहेब बोठे, वसंतराव चेडे, कृष्णकांत बडवे, सुनिल थोरात, बबनराव डावखर, सागर मैड, विश्वास रोहोकले, सुभाषराव दुधाडे, डॉ. अभिजित रोहोकले, अरुण रोहोकले, संभाजी आमले, अशोक लकडे, जगदीश आंबेडकर, बाबासाहेब महापुरे आदी पदाधिकाऱ्यांनी आंबेडकर यांचे अभिनंदन केले आहे.