• Sat. Nov 1st, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिकन्याय भवनात वृक्षारोपण

ByMirror

Jun 22, 2024

वृक्षरोपणाने राष्ट्रपतींचा वाढदिवस साजरा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिकन्याय भवन परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण अभियान घेण्यात आले होते. यावेळी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, मोहन क्षीरसागर, जालिंदर वाल्हेकर, योगेश काळे, विक्रम फुलारी, उज्वला बनकर, ज्योती माळी, सुमन पवार, शोभा गोलवड, सुनंदा घाडगे आदी आदींसह महिला कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.


राधाकिसन देवढे म्हणाले की, प्रत्येकाने कर्तव्य म्हणून निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग हा सजीव सृष्टीचा पाया असून, निसर्गावर घाला घातला जात असल्याने त्याचे दुष्परिणाम तापमान वाढ, बदलेले ऋतू, अवकाळी पाऊस यातून दिसत आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ते जगविण्याचे त्यांनी आवाहन केले.


सुनिल सकट म्हणाले की, मानवाने आपल्या सुख-सोयींसाठी निसर्गाचे शोषण करुन त्याची मोठी हानी केली. मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मानवाचे कल्याण व अस्तित्व निसर्गाशी जोडलेले असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कडुनिंब, करंजी आदी देशी झाडांची यावेळी लागवड करण्यात आली. समाज कल्याण विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांचे पालकत्व स्विकारण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *