प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी केडगाव मॉर्निंग ग्रुपने घातले साकडे
नगर (प्रतिनिधी)- मेहेराबाद (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा यांच्या समाधी स्थळी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी केडगाव मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.
अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य लाभण्यासाठी अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीवर मनोभावे प्रार्थना करण्यात आली. तर अरुणकाका लवकर बरे होवून शहरात समाजकारणात पुन्हा सक्रीय होण्यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी प्रकाश पवार, दिलीप दुधावने, भाऊसाहेब फलके, अण्णासाहेब शिंदे, महेश दळवी, अनिल भोर, सचिन घेंबुड, बंटी विरकर, उमेश सुंबे आदी उपस्थित होते.