नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी रविवारी (दि.20 एप्रिल) पुणे कॅम्प येथील गुरुसिंग सभा गुरुद्वारा (हॉलीवुड) येथे अरदास (प्रार्थना) करण्यात आली.
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, ते आजारातून बरे होण्यासाठी गुरुद्वाऱ्यात अरदास करण्यात आले. तर सामुदायिकपणे अरुणकाकांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, सुहास टिंगरे, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, मुन्नाशेठ जग्गी, प्रदीप धुप्पड, टोनी मक्कर, गणेश विधे, गुरुद्वाऱ्याचे विश्वस्त सरदार बेदी आदी उपस्थित होते.
सर्वांच्या प्रार्थनेने अरुणकाका जगताप लवकरच बरे होवून नगर शहरात परतणार असल्याची भावना जनक आहुजा यांनी व्यक्त केली.