शहर हिरावाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटणार -शितल जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- मनुष्याला श्वासासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम झाडे करत असतात. तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणे आवश्यक आहे. शहर हिरावाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार असल्याची भावना नगरसेविका शितल जगताप यांनी व्यक्त केली.
मार्केटयार्ड येथील नागेश्वर मंदिर परिसरात नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, रजनी भंडारी, मेघना मुनोत, अलका कालानी, मीना डोळसे, साधना डोळसे, उषा सोनटक्के, उषा सोनी, वंदना गारुडकर, नीलिमा पवार, छाया शिंदे, वर्षा वाबळे, गोदावरी मंत्री, कल्याणी ढूमसे आदी उपस्थित होत्या.
प्रकाश भागानगरे म्हणाले की, सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने या सामाजिक चळवळीत योगदान देण्याची गरज आहे. आज केलेले वृक्षरोपण आपल्या भावीपिढीच्या कल्याणासाठी असणार असल्याचे त्यांनी सांगितले. भागानगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून नागेश्वर मंदिर परिसरात विविध देशी फळ झाडांची लागवड करण्यात आली.