• Thu. Oct 16th, 2025

कटारिया परिवाराच्या वतीने भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण

ByMirror

Jan 17, 2025

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार

हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ -सीए रविंद्र कटारिया

नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ आहे. प्रत्येकाचे जीवन आनंदी व निरोगी बनविण्याचा ध्यास घेऊन ग्रुपचे कार्य सुरु आहे. सर्वधर्मसमभावाने सुरु असलेल्या या कार्याला सर्व माणसे जोडले गेली असल्याचे प्रतिपादन सीए रविंद्र कटारिया यांनी केले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून कटारिया परिवाराच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी कटारिया बोलत होते. याप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए श्रेयांश कटारिया, सीए सिद्धार्थ कटारिया, सीए श्रेणीक कटारिया, विठ्ठल (नाना) राहिंज, ॲड. सुरेंद्र कटारिया, ॲड. सिद्धेश कटारिया, धर्मेंद्र मोर्या, विशाल गांधी, रमेशराव वराडे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, दिपक धाडगे, सुधीर कपाळे, भारतीताई कटारिया, प्रांजली सपकाळ, केतकी कटारिया, सविताताई परदेशी, निकिताताई गांधी, निधी खंडेलवाल, भारती सुरेंद्र कटारिया, राखी पांचारिया आदींसह हरदिन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे सीए कटारिया म्हणाले की, प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात हरदिनच्या आनंदी हास्य योगाने होत आहे. यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जातो. हरदिन ही प्रत्येकासाठी मेडिकलची गोळी बनली असून, त्यामुळे जीवनात निरोगी व आनंद निर्माण होत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची शिस्त लावण्यात आलेली आहे. सर्व समाज घटकातील एकत्र आलेला वर्ग पर्यावरण संवर्धनासह देत असलेले सामाजिक योगदान दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय सपकाळ म्हणाले की, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतीत केले. मात्र सध्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. ज्येष्ठांचा आदर्श समोर ठेऊन पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण हा समाजाचा आधार असून, हा आधार कोसळल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. यासाठी हरदिनच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ एकत्रित चालविली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रत्येक वेळेस या सामाजिक चळवळीला कटारिया परिवाराने बळ देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कटारिया परिवारासह हरदिनच्या सदस्यांनी जॉगिंग पार्कमध्ये विविध देशी प्रकारचे झाडांची लागवड करुन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *