पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम
देश स्वच्छ व हरित करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाभर वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम चालविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त कोल्हारच्या गडावर 74 गोरख चिंच औषधी झाडांची लागवड करण्यात आली.
कोल्हार कोल्हुबाई माता गडावर (ता. पाथर्डी) महादेव मंदिर परिसरात झालेल्या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी माजी सरपंच बाबाजी पालवे, मुख्याध्यापक नामदेव जावळे, प्रा. प्रेम कुमार पालवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे, ईश्वर पालवे, मा. उपसरपंच कारभारी गर्जे, जय हिंदचे शिवाजी पालवे, अशोक गर्जे, नामदेव गिते, किसन जावळे, रविंद्र पालवे, गणेश पालवे, ऋषी पालवे, सिंहगडचे किरणशेठ पालवे, विष्णू गिते, हावसराव पालवे, सुयोग पालवे, शुक्राचार्य पालवे, तारकेश्वर पालवे, प्रतीक नेटके, अनिकेत पालवे, विक्रांत पालवे, सार्थक पालवे, शुभम पालवे, अभिषेक पालवे, किशोर पालवे, विठ्ठल डमाळे, दिगंबर पालवे, कार्तिक नेटके, संतोष पालवे आदी उपस्थित होते.

शिवाजी पालवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला विकास पुरुष लाभलेले आहे. भारत देशाचा जगात सन्मान वाढविण्यासाठी त्यांची कामगिरी सर्वोत्तम ठरत आहे. देश सशक्त होवून महासत्तेकडे वाटचाल करत आहे. पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेसाठी त्यांनी विशेष काळजी घेतली असून, देश स्वच्छ व हरित करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तर गोरख चिंच हे झाड अतिशय दुर्मिळ असून, त्याला औषधी गुणधर्म आहे. हे झाड दीर्घायु असून, भव्य स्वरुपाचा आकार असतो. भगवान गोरक्षनाथ यांनी या झाडाखाली तप केल्याचे त्याला पौराणिक महत्त्व आहे. त्यामुळे या झाडाला गोरख चिंच हे नावाने संबोधले जात असल्याची माहिती पालवे यांनी दिली.
ग्रामस्थांच्या वतीने माजी मुख्याध्यापक नामदेव जावळे गुरुजी, माजी सरपंच बाबाजी पालवे, प्रा. प्रेमकुमार पालवे यांनी आपल्या भाषणात ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होत असलेल्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वृक्षरोपणाचे महत्त्व विशद केले. आभार सुभेदार अशोक गर्जे यांनी मानले.
