• Wed. Oct 29th, 2025

कोल्हारला 105 झाडांची लागवड

ByMirror

Jun 6, 2024

वृक्ष दान चळवळ मोहिमेला हातभार लावण्याचे आवाहन

सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही -शिवाजी पालवे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व 1 जूनला सामूहिक वाढदिवस असलेल्या 30 ते 40 जणांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हार (ता. पाथर्डी) येथे 105 झाडांची लागवड करण्यात आली.


पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर होत असताना व यावर्षी राज्यात सर्वच ठिकाणी तापमान वाढलेले असताना पर्यावरण संवर्धाला हातभार लावण्यासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य एकनाथ आटकर, महादेव पालवे गुरुजी, संदीप जावळे, शिवाजी गर्जे, प्रेमकुमार पालवे, रमेश जावळे, उपसरपंच इमरान शेख, आबा गरुड, ईश्‍वर पालवे, जालिंदर भिंगारदिवे, दीपक जराड, भाऊसाहेब आव्हाड, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहीदास पालवे, संतोष शिंदे, बबन पालवे, बाबाजी पालवे, भाऊसाहेब पालवे, शिवाजी पठाडे, त्रिंबक पालवे, साळुबा नेटके, धनु गर्जे, संजय जावळे, भाऊसाहेब पालवे, आश्रुबा पालवे, विष्णू गीते, महादेव पालवे, बाबाजी पालवे, योहान नेटके, नामदेव गीते, बाबाजी पालवे, कैलास पालवे, पोपट गीते, पोपटराव पालवे, भगवान डमाळे, अशोक पालवे, विठ्ठल पालवे, महादेव पालवे, भाऊसाहेब डमाळे, केशव डमाळे आदी उपस्थित होते.


शिवाजी पालवे म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षरोपण मोहिम न राबविल्यास दिवसंदिवस तापमान वाढून सजीवसृष्टी धोक्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना 40 च्या पुढे तापमान जात आहे. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

तर जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन देखील केले जाणार आहे. कोल्हार घाट ते गाव रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रभावीपणे वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबवली जात आहे. या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष दान चळवळ मोहिम हाती घेण्यात आली असून, नागरिकांना वृक्षरोपणासाठी विविध प्रकारची रोपे दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रोपे पावसाळ्यात उजाड माळरान, डोंगर रांगा, गावातील वाडी-वस्ती, रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणार आहे व त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *