जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम
सर्वाधिक वटवृक्ष असलेले देवस्थान म्हणून भगवान गडाची नवीन ओळख निर्माण होणार -नामदेव शास्त्री महाराज
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने भगवानगड (ता. पाथर्डी) येथे 100 वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या वृक्षारोपणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत वृक्ष फेरी देखील काढण्यात आली होती.
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, भगवानगडाचे उत्तर अधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज जायभाये, ह.भ.प. स्वामी महाराज, पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे, ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री, नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाने या 100 वडाच्या झाडांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जय हिंद चे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संभाजी शिरसाठ, पप्पू ढाकणे, म्हातारदेव नेहरकर, गोरक्ष पालवे, ईश्वर पालवे, शर्माभाऊ पालवे, सरपंच राजू नेटके, महादेव पालवे गुरुजी, विष्णू गिते, शंकर डमाळे, बबन पालवे, तबाजी गर्जे, कैलास पालवे, बुवासाहेब पालवे, धर्मराज शिरसाठ, प्रतिभा शिरसाठ, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपाल रामदास शिरसाठ, बबन मंचरे, वनरक्षक विजय पालवे, बाळकृष्ण बडे, सागर साळवे, हनुमान नाईकवाडे, वनसेवक बाळू बटुळे, त्रिदल सैनिक संघटनेचे गोवर्धन गर्जे, रोहिदास एडके, सुधाकर आव्हाड, म्हातारदेव आव्हाड, अंबादास कोरडे, भानुदास केदार, पप्पू गोल्हार, शिवनाथ ढोले, श्रीकृष्ण दौंड, प्रल्हाद ढाकणे, रामराव चेमटे, पांडुरंग जवरे, रामकिशन कुटे, रामनाथ भाबड आदी उपस्थित होते.
ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज म्हणाले की, भगवान गडावर लागवड करण्यात आलेली 100 वडाच्या झाडाने निसर्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तर आलेल्या भक्तांना सावली मिळणार आहे. सर्वाधिक वटवृक्ष असलेले देवस्थान म्हणून भगवान गडाची नवीन ओळख निर्माण होणार आहे. भगवानगड देशात प्रसिद्ध असलेला संत भगवान बाबांची समाधी असून, त्याच पद्धतीने देशाचे राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाच्या झाडाची मोठ्या प्रमाणात केलेली लागवड कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी जय हिंदचे जिल्ह्याभर सुरु असलेल्या वृक्षारोपण अभियानाचे कौतुक केले. भास्करराव पेरे पाटील यांनी जय हिंद फाउंडेशन हे मोठ्या आस्थेने वनराई फुलविणारे एकमेव फाउंडेशन आहे. जिल्ह्यात हजारो झाडांची लागवड करुन ते झाडे जगविण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी फाऊंडेशनची चळवळ दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक रामदास आंधळे व ह.भ.प. कृष्णा महाराज जायभाये व ह.भ.प. स्वामी महाराज यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आभार गोवर्धन गर्जे यांनी मानले.