• Wed. Apr 16th, 2025

पीपल्स हेल्पलाइन व राष्ट्रीय बहुजन सभेतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

ByMirror

Apr 15, 2025

समतेच्या महामार्गाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर -प्रकाश थोरात

नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्रांतीचे अग्रदूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती पीपल्स हेल्पलाइन व राष्ट्रीय बहुजन सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मार्केटयार्ड चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पीपल्स हेल्पलाइनचे प्रकाश थोरात, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, धम्ममित्र अनिल घाटविसावे, संदीप पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रकाश थोरात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे एका महामानवाचा संघर्षमय प्रवास आहे. त्यांनी दु:खी, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंड प्रयत्न केले. समतेच्या महामार्गाचे शिल्पकार ते शिल्पकार ठरले. भारताच्या संविधानामधून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांची पायाभरणी केली. हे संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून, तो समाजपरिवर्तनाचा जिवंत दस्तऐवज असल्याचे त्यांनी सांगितले.


पांडुरंग गायसमुद्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे वंचित, उपेक्षित घटकांना मनुष्यफ म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. ते केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायक आहे. आजच्या काळातही त्यांचे विचार समाजाला दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *