शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे दिले जाणार धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने पाच दिवसीय पशुसंवर्धनवर आधारित शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एमआयडीसी येथील आयटी पार्क, सारस्वत बँक शेजारी 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योग गुरु रविराज भालेराव मार्गदर्शन करणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना शेतीला जोड म्हणून पशुसंवर्धनासाठी चारा व्यवस्थापन, विविध आजारांवर लसीकरण, प्राथमिक उपचार, विमा प्रकल्पाची माहिती दिली जाणार आहे. शासनाच्या व बँकेच्या विविध कर्ज योजना, कर्जावरील सबसिडी यावर विविध बँक अधिकारी मार्गदर्शन करणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात 18 ते 50 वयो गटातील महिला पुरुषांना सहभागी होता येणार आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता पाचवी ते पदवीधारक असून, या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी 9960599985 व 7798555502 या नंबर वर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.