शालेय शिक्षिकांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुहास धीवर यांना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकराव टेमकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच रोटरीच्या वतीने शाळेच्या विज्ञान शिक्षिका कविता जोशी यांनाही आदर्श शिक्षिका पुरस्कार के. बालराजू यांच्या हस्ते देण्यात आले. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वर्षभर शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिले जाते. विद्यालयाने आजपर्यंत तीन राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. तर शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहे. या कार्याची दखल घेऊन रोटरीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने पंडित नेहरू हिंदी विद्यालयास सन्मानित करण्यात आले.
प्रेरणा प्रतिष्ठान तर्फे शाळेतील शिक्षिका मोनिका मेहतानी, शिल्पा पाटोळे, कमल भोसले यांना देखील आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव किशोर मुनोत, मुख्याध्यापक सुहास धीवर यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व ग़ुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक धीवर, शालेय शिक्षक बाबासाहेब बोडखे, कमल भोसले, मोनिका मेहतानी, गोपीचंद परदेशी, कविता जोशी, सुदेश छजलानी, शिल्पा पाटोळे, वैभव शिंदे, ठाकूरदास परदेशी, योगेश गायकवाड आदी योगदान देत आहे.
