• Thu. Oct 16th, 2025

पद्मशाली समाजातील आजी-माजी शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा 9 सप्टेंबरला होणार सन्मान

ByMirror

Aug 31, 2023

सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शहरातील कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाच्या वतीने दि.9 सप्टेंबर रोजी पद्मशाली समाजातील आजी-माजी शिक्षक व विविध शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. या सन्मान सोहळ्यात समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम, कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारम व सचिव प्रा.बाळकृष्ण गोटीपामुल यांनी केले आहे.


हा सोहळा कोर्ट गल्ली येथील सुयोग मंगल कार्यालयात सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. पद्मशाली समाजातील 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या पदविका, पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या आजी-माजी शिक्षकांचा गौरव होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्राच्या झेरॉक्ससह 9890345659, 9890404048, 9860840184 व 9850986340 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *