• Mon. Jan 12th, 2026

अन्यथा पेन्शनर निवडणुकांमध्ये केंद्रातील भाजप सरकार विरोधात घेणार भूमिका?

ByMirror

Sep 20, 2023

डिसेंबर अखेर पर्यंत पेन्शन वाढ द्या

महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचा शहरात रविवारी मेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- दहा ते बारा वर्षापासून सातत्याने संघर्ष करुन देखील पेन्शन वाढ होत नसल्याने भविष्यातील निवडणुकांमध्ये केंद्रातील भाजप सरकार विरोधात भूमिका घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या वतीने शहरात रविवारी (दि.24 सप्टेंबर) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


दातरंगे मळा, मार्कंडेय संकुल येथे होणाऱ्या या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व ईपीएस-95 धारकांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहीफळे व सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना 2012 सालापासून ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढसाठी प्रयत्न करीत आहे. दहा ते बारा वर्ष होऊन सुद्धा पेन्शन वाढ झालेली नाही. 2012 साली तत्कालीन खासदार भगतसिंग कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने 2013 साली केंद्र सहकारला अहवाल सादर केला. 20 एप्रिल व 29 ऑगस्ट 2023 रोजी लोकसभा सेक्युरिटी पार्लमेंट हाऊस (न्यू दिल्ली) येथपेन्शन संघटना व ट्रेड युनियन संघटना यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे.


सदर रिपोर्टमध्ये किमान 3 हजार पेन्शन व महागाई भत्ता द्यावा यासाठी समितीने शिफारस केली. समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला असता तर अद्याप पर्यंत पेन्शन धारकांना 8 ते 9 हजार रुपये पेन्शन झाली असती. 12 वर्षापासून पेन्शन धारकांनी केंद्र सरकारच्या विरोधात सतत पेन्शन वाढसाठी आंदोलन केले, तरी अद्यापही पेन्शन वाढ झालेली नाही. डिसेंबर आखेर पेन्शन वाढ न झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात मतदान करणे, मतदानावर बहिष्कार टाकणे, मतदानाला जाऊन नाटोचा वापर करण्याचा सर्वांची मते जाणून घेवून या मेळाव्यात निर्णय घेतला जाणार आहे.


या मेळाव्यात निवृत्त कर्मचारी 1995 राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलिकराव पांडे (नागपूर), महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, आनंदराव वायकर, महारुद्र मोराळे, कॉ. ॲड. सुधीर टोकेकर मार्गदर्शन करणार आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बाबुराव दळवी, ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाडे, अंकुश पवार, सचिव भागिनाथ काळे, चिटणीस आबासाहेब सोनवणे प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *