• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ByMirror

Oct 2, 2024
सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गुरुवारी घटस्थापना व मंगळवारी रंगणार माती की चौकी

समाजबांधव व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर) सकाळी मंदिरात विधीवत पुजा करुन घट स्थापना केली जाणार आहे. नऊ दिवस भजन, किर्तनसह दांडिया कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी दिली.


मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता माता की चौकीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये श्रीरामपूर येथील राजेश अलग जागरण मंडळाचे कलाकार देवीचे भक्तीगीत सादर करणार आहे. आरतीनंतर प्रसाद वाटप होणार आहे.


शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता महिला भजन मंडळीच्या उपस्थितीमध्ये पूर्णाहुति यज्ञ संपन्न होणार आहे. तर दररोज नवरात्र उत्सवानिमित्त सायंकाळी 4 ते 6 वाजता भजन होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता माता की आरती पार पडणार आहे. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त सर्व समाजबांधव एकत्र येणार आहे. या कार्यक्रमास समाजबांधव व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिराच्या वतीने सर्व विश्‍वस्तांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *