माळी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, 22 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. जनवार्ता, जय युवा अकॅडमी, श्री संत सावता माळी युवक संघ, फिनिक्स सोशल फाउंडेशन, माळी महासंघ, समृद्धी महिला संस्था, रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या वधु-वर परिचय मेळाव्यात विवाह इच्छुक वधु-वर व त्यांच्या पालकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माळी समाज संपूर्ण महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय निमित्त विखुरला गेला आहे. आधुनिक काळात प्रत्यक्ष गाठीभेटीचे प्रमाण कमी झाल्याने मुला-मुलींचे विवाह जुळविण्यास अडचणी येत आहे. तर घटस्फोटीत, विधवा, विधूर, दिव्यांग, विना आपत्य-आपत्य अशा इतर अनेक कारणांनी योग्य जोडीदार न मिळाल्याने अनेक कुटुंबांना विवाहाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा सर्व विवाह इच्छुकांची नोंदणी केली जाणार असून, वधूंची मोफत नोंदणी केली जाणार आहे.
तर संपूर्ण महाराष्ट्रात माळी समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, पत्रकारिता क्षेत्रातील तज्ञ अभ्यासू व्यक्तींना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव होणार असल्याची माहिती संयोजक पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, गणेश बनकर, नितीन डागवाले, सचिन गुलदगड, जालिंदर बोरुडे, शेखर होले, स्वाती डोमकावळे, ॲड. सुनील तोडकर यांनी दिली दिली. ही नाव नोंदणीसाठी आवश्यक माहिती व पुरस्कारासाठी प्रस्ताव 15 ऑक्टोंबर पर्यंत ॲड. महेश शिंदे यांच्या टांगे गल्ली, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या कार्यालयात पाठविण्याचे म्हंटले आहे. अधिक माहितीसाठी 9004722330 व 9921810096 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
