• Sat. Mar 7th, 2026

मुकुंदनगर येथे 26 ऑक्टोबरला इज्तेमाई खत्ना चे आयोजन

ByMirror

Oct 9, 2024

नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम

गरजूंना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात इज्तेमाई खत्ना चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नाममात्र शुल्कात खत्ना करुन मोफत औषधे दिली जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून या उपक्रमास प्रारंभ होणार आहे. मालेगाव येथील खलिफा डॉ. वसीम शेख मुलांची खत्ना करणार आहे. नाव नोंदणीसाठी समीर कुशन हेडकॉटर गेट व्हिन्सेनपुरा व राज जनरेटर्स हातमपुरा येथे नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी इलियास जहागीरदार, डॉ. जुबेर शेख, अन्सार शेख, नदीम शेख. अबुजर शेख, शफीक शेख, अतहर सय्यद, रिजवान सय्यद. शब्बीर पत्रकार.आदी परिश्रम घेत आहे.
अधिक माहितीसाठी जावेद खान 9273255242, नासिर सर 8080979730 व ईलियास शेख 9890786560 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *