आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद महिला व युवतींना करणार मार्गदर्शन
नगर (प्रतिनिधी)- सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 10 जानेवारी रोजी ब्युटी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद ब्युटी पार्लर प्रशिक्षणाबाबत महिला व युवतींना मोफत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके, विद्या सोनवणे, आरती शिंदे व जयश्री शिंदे यांनी दिली.
नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय ब्युटी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक पद्धतीचे शास्त्रोक्त पद्धतीने मेकअप करण्याची कला बाजारात प्रचलित होत आहेत. सौंदर्याबाबत महिला देखील जागृत झाल्या असून, सौंदर्य खुलवण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेतली जात असताना महिला व युवतींना याचे अद्यावत ज्ञान दिले जाणार आहे. बाजारात नव्याने आलेले सौंदर्य प्रसाधने, त्वचेला हानी न पोहोचविता करता येणारी उपाययोजना व सुंदरता वाढविणे आदी विविध तंत्रज्ञानाची माहिती देखील या सेमिनार मधून मिळणार आहे.
ब्युटी क्षेत्रात चांगले करिअर करण्याची व महिलांना स्वयंरोजगारीची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सेमिनार व ब्युटी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागासाठी होण्यासाठी 9921712312 व 9657511869 यावर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ब्युटीशियन महिलांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे म्हंटले आहे.