पाथर्डी तालुक्यातील वाडी-वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेतील 650 विद्यार्थ्यांना रोपं वाटप
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने एक विद्यार्थी, एक झाड! ही मोहिम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेतंर्गत पाथर्डी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन 650 विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी विविध देशी व फळ झाडांची रोपे भेट देण्यात आली. फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
या अभियानाची सुरुवात कासारवडी (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद शाळेतून करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपं देण्यात आली. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच चारुदत्त वाघ, उपसरपंच वैभव आंधळे, गणेश कासार, बाळासाहेब भोसले, गाडेकर, फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भिमराज पाटेकर, संजय पाटेकर, उद्धव शिरसाठ आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जवखेडे दुमाला, जवखेड खालसा, कामत शिंगवे, आडगाव, रेनुकाईवाडी, शिंगवे केशव व मिरी या गावातील जिल्हा परिषद शाळेत एक विद्यार्थी, एक झाड! अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोपं देऊन, पर्यावरण संवर्धनाबद्दल माहिती व वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच विविध शाळांमध्ये झाडांचे संवर्धन करुन त्याला मोठे करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले.

शिवाजी पालवे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला गती मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी भावी पिढीने उचललेले पाऊल दिशादर्शक ठरणार आहे. विद्यार्थ्यांसह समाजाचे भवितव्य पर्यावरणावर आधारलेले असून, त्याच्या रक्षणासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना चिंच, आंबा, आवळा, बांबू, करंज, जांभूळ, सिसम, बावळा, गोरख चिंच अशा प्रकारची अनेक झाडे वाटप करण्यात आले. या अभियानासाठी कासारवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गाडेकर, लवांडे मॅडम, जवखेड दुमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तुषार तुपे, छाया लोंढे, धोंडीराम भोसले, उपसरपंच भास्कर नेहुल, जवखेड खालसा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जयश्री खरात, माधुरी गायकवाड, शैलेजा मरकड, कामत शिंगवे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महेश लोखंडे, राधाकिसन जाधव, सुभाष कराळे, पोपट कराळे, आदिनाथ कराळे, बबन कराळे, आडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब डमाळे, ह.भ.प. बाबासाहेब गडकर महाराज, सिताराम सावंत, महादेव शिंदे, संभाजी पवार, रेणूकाईवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश शिंदे, उपशिक्षिका प्रगती पालकर, मिरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निलेश क्षीरसागर, मा. सरपंच संतोष शिंदे, डॉ. बबनराव नरसाळे, सुभाष गवळी, रोहीदास निमसे, राजाभाऊ पालवे, बन्सी ठोंबे, संगिता पवार, मनिषा सातपुते, शिंगवे केशव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मायाताई मेढे, ह.भ.प. गंगाधर महाराज गाडेकर, राजेंद्र खंडागळे, कविता चव्हाण, भिमराज चव्हाण, उंडे सर आदींनी योगदान दिले. आभार माजी सैनिक भिमराज पाटेकर यांनी मानले.
