गावाच्या सुख-समृध्दीसाठी देवीला घालणार साकडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या सुख-समृध्दीसाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील महिला भाविक मोहटा देवीला (ता. पाथर्डी) पायी मार्गस्थ झाल्या. नवरात्र उत्सवानिमित्त देवीला साकडे घालण्यासाठी महिला पायी निघाल्या आहेत.
महिला भाविकांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पायी यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी महिलांचा सत्कार केला. यावेळी विमल रासकर, शांता उधार, लताबाई उधार, मंगल फलके, कांचन डोंगरे, मंगल जाधव, मंजुळा उधार, सविता निशाद, बेबी कदम, सुमन डोंगरे, बेबी उधार, छाया रासकर, शितल इधाटे, परीगा निमसे, कुसुम रक्ताटे, लता गायकवाड, गंगूबाई फलके, ह.भ.प. विठ्ठल फलके, नारायण जाधव, तुषार रासकर, अशोक गायकवाड आदींसह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
