जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम
रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे सोमवारी (दि.16 ऑक्टोबर) संध्याकाळी टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया नाईटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सविता काळे यांनी केले आहे.
तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात महिलांनी एकत्र येऊन जिव्हाळा ग्रुपची मुहुर्तमेढ रोवली. या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे. तर विविध सण-उत्सवात महिलांना एक व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी ग्रुपचे कार्य सुरु आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला जोडल्या गेल्या आहेत. या दांडिया नाईटच्या कार्यक्रमात नवरात्रीनिमित्त दुर्गा पूजा व विविध स्पर्धा रंगणार असल्याची माहिती अल्पना कासवा यांनी दिली.
यामध्ये बेस्ट सोलो डान्सर, बेस्ट कपल डान्स, बेस्ट ड्रेसअप, बेस्ट ग्रुप डान्स, बेस्ट किड्स डान्सरचे आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. तर मिस व मिस्टर जिव्हाळा हे विशेष पुरस्कार यावर्षी ठेवण्यात आले आहे. या दांडिया नाईटचे वैशिष्टये म्हणजे नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजे, एलईडी वॉल स्टेज आणि फूड काउंटर्स राहणार आहे. तसेच दहा भाग्यवान विजेत्यांना कुपनच्या लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे, महिलांना पैठणी साडीसह सोने व चांदीचे बक्षीस दिले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी तनिष्क ज्वेलर्स, सरस्वती हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले असून, गुरव ज्वेलर्स, आनंद मार्बल्स (तीसगाव), इगो कलेक्शन कडून विजेत्यांना बक्षीसे देण्यात येणार आहेत.
