• Tue. Jul 22nd, 2025

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना

ByMirror

Feb 19, 2024

मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम; महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला.

लखलखत्या पणत्यांचा झगमगाटात शिवाजी महाराजांचा जयजयकार करुन शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिला शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांना दीपोत्सवाने मानवंदना दिली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

तर महिलांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला. यावेळी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, अलकाताई मुंदडा, मिनाक्षी जाधव, राखी जाधव, प्रतिभा भिसे, आशा गायकवाड, प्रिया गायकवाड, नंदिनी गांधी, मिनाक्षी वाघस्कर, अर्चना बोरुडे, अलकाताई मुंदडा, प्रिया गायकवाड, सुजाता पुजारी, इंदू गोडसे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *