• Fri. Sep 19th, 2025

निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

ByMirror

Aug 22, 2024

क्रीडा क्षेत्रात डोंगरे यांचे मोलाचे योगदान -प्रकाश पोटे

अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, टाकळी ढोकेश्‍वरचे सरपंच बाळासाहेब खिलारी, दिलीप नलगे पाटील, हरिभाऊ जाधव, संतोष हांडे, चाँद सुलताना हायस्कूलचे व्हाईस चेअरमन असगर सय्यद आदी उपस्थित होते.


प्रकाश पोटे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात पै. नाना डोंगरे मोलाचे योगदान देत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा घेऊन खेळाडू घडविण्याचे काम ते करत आहे. समितीच्या माध्यमातून भरविण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांना खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रातही पै. नाना डोंगरे यांचे उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी त्यांची नेहमीच धडपड सुरु असते. क्रीडा समितीच्या माध्यमातून त्यांच्याकडून उत्तम प्रकारे कार्य होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *