राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य तथा ज्येष्ठ विधीज्ञ एम.एम. तांबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा गणराज प्रकाशन, फिनिक्स सोशल फाउंडेशन व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आदी साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, साहित्यिका प्रा. मेधाताई काळे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, कवयित्री प्रा. शालिनी वाघ, कवी सखाराम गोरे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, प्रा. बबन भोसले, प्रा. बापू चंदनशिवे, लेखक गणेश भगत, संजय सावंत आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी प्राचार्य तांबे यांचा निवडीबद्दल गौरव करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्राचार्य तांबे यांनी आपला खडतर जीवन प्रवास ओघवत्या शैलीमध्ये मांडल्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे झाले. उपस्थितांनी तांबे यांना विविध ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भगत यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.